राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र
💠 केंद्र प्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रम (KPALP) -
गुरुवार दि. १४ मे २०२० रोजी राज्यातील सर्व केंद्रप्रमुख, विस्तारअधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत केंद्र प्रमुख शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रमांतर्गत (KPALP) तिसऱ्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
🎯 वेबिनारच्या सुरुवातीस *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्रभारी प्राचार्य श्री. विकास गरड* यांनी राज्यातील सर्व केंद्रप्रमुख, विस्तारअधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचे स्वागत केले. *सदर वेबिनार हा SCERT, UNICEF व CEQUE* संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
🎯 परिषदेचे *संचालक मा. दिनकर पाटील साहेब* यांनी या वेबिनारसाठी आवर्जून उपस्थित असलेल्या *मा. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र, शासन* यांचे स्वागत केले. शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व केंद्रप्रमुख यांना आज *मा. वंदना कृष्णा* यांच्या मार्गदर्शनाची चांगली संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना शासनाच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजचा कार्यक्रम निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे मत त्यांनी मांडले.
🎯 *मा. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र, शासन* यांनी मार्गदर्शनपर आपले विचार व्यक्त करताना सध्याच्या कोविड परिस्थितीत येत्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करता येईल याविषयी सखोल माहिती दिली. किती शिक्षक व मुले ऑनलाइन पद्धतीने शिकवितात व शिकतात याची माहिती आपल्याला योग्य पद्धतीने उपलब्ध करून घ्यावी लागेल व त्या अनुषंगाने उपाययोजना कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले. *शिक्षण क्षेत्रातील विविध शासन निर्णयांचे सुलभीकरण करता यावे तसेच कालबाह्य झालेल्या शैक्षणिक नियमात सुधारणा करण्यात यावी यासाठी आपण सर्वांनी सुचविलेल्या सूचना निश्चितच स्वागतार्ह असतील व त्याविषयी योग्य ती उपाययोजना केली जाईल असा ठाम विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.*
🎯 परिषदेचे *प्र. प्राचार्य, विकास गरड* यांनी Learning From Home साठी पालकांचा सहभाग या वेबिनार अंर्तगत आजच्या वेबिनारची उद्दिष्टे व माहितीची मांडणी याची सविस्तर अशी माहिती उपस्थितांना दिली.
🎯 *CEQUE संस्थेच्या प्रमुख उमा मॅडम* यांनी Learning From Home साठी पालकांचा सहभाग व त्याचे महत्त्व विस्तृतरित्या विशद केले.
🎯 केंद्रप्रमुख मनोगत याअंतर्गत *सुभाष शिंदे*, केंद्रप्रमुख, केंद्र-पाटेगाव, तालुका-पैठण, जिल्हा - औरंगाबाद व *श्री. गोरे*, केंद्रप्रमुख, केंद्र - विडोळी, तालुका-मंठा, जिल्हा - जालना यांनी कृती आराखडा, पालकांचा सहभाग, तसेच गावातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शिक्षणप्रेमी यांच्यामार्फत केलेले पालकांचे उद्बोधन, पालकांचे केलेले व्हाट्सॲप ग्रुप व दिक्षा अॅपचा केलेला वापर याविषयी इत्यंभूत अशी माहिती देऊन उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
🎯 *जि.प.प्रा.शाळा श्रीरामतांडा येथील इयत्ता २ री ची विद्यार्थिनी कु. अनुश्री तोटकर* हिने घरी असूनही दिक्षा ॲपच्या माध्यमातून कसा अभ्यास करता येतो हे सांगतानाच शिक्षणाविषयीचे आपले प्रेम अधोरेखित केले.
🎯 *डॉ. सतिश सातव, अधिव्याख्याता, DIET जालना* यांनी जालना जिल्ह्यात राबविण्यात येत असणाऱ्या *केंद्र दत्तक योजना* व *पालक संपर्क अभियान* याची सविस्तर अशी माहिती दिली.
🎯 *युनिसेफच्या मैथिली गुप्ते* यांनी कोविड दैनंदिनी म्हणजे काय व दैनंदिनीमध्ये यशोगाथेचा समावेश कसा केला जाईल याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
🎯 *हेतल गांधी* यांनी व्हायरस वीर या पुस्तकाची माहिती सांगितली.
🎯 *Emotional Wellbeing या सदरांतर्गत टाटा सोशल सायन्स संस्थेच्या डॉ. अपर्णा जोशी* यांनी खालील मुद्द्यांच्या आधारे मार्गदर्शन केले.
👉🏼 कोविडचा सामाजिक व मानसिक परिणाम
👉🏼 मुलांवर होणारा परिणाम
👉🏼 पालकांसमोर असलेली काळजी
👉🏼 मुलांना मदत करण्याचे विविध मार्ग
👉🏼 स्वतःची व इतरांची काळजी
🎯 *शोभा कपूर* यांनी Home Learning Package ची माहिती देताना गली गली सिम सिम या कार्यक्रमाचा प्रोमो दाखवला. ३ ते १० वयोगटातील मुलांना मजेदार गोष्टी सोप्या भाषेत या कार्यक्रमातून शिकता येतील असे त्यांनी सांगितले.
🎯 *प्रथम संस्थेचे हिमांशू* यांनी Home Learning Package अंतर्गत *मिस्ड कॉल दो, कहानी सुनो* या उपक्रमाची तर *स्मितिन* यांनी *शाळेबाहेरची शाळा* याविषयी माहिती दिली.
🎯 *विचारा आम्हाला तुमचे प्रश्न* याअंतर्गत उपस्थितांच्या प्रश्नांना अपर्णा जोशी यांनी उत्तरे दिली.
🎯 *परिषदेचे प्र. प्राचार्य श्री. विकास गरड* यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आजच्या या वेबिनारसाठी मोठ्या संख्येने केंद्र प्रमुख व सर्वच अधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल व वेबिनार यशस्वी करण्यासाठी कार्यरत श्रीम. मैथिली गुप्ते (युनिसेफ), श्रीम. उमा मॅडम, या सर्वांचे आभार मानले.
*आजच्या तिसऱ्या वेबिनारला राज्यातून ३८६७ अधिकारी व केंद्रप्रमुख इतक्या प्रचंड प्रमाणात उपस्थित होते.*
*दिनकर पाटील*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

जळगाव डायटचे वेबीनार मिटींगच्या संक्षिप्त मुद्दे प्रसारित करुन चांगला व उपयुक्त उपक्रम राबविला, प्रत्यक वेबीनारची संक्षिप्त माहिती पब्लीश करत राहा.
ReplyDeleteमसूद शेख
केंद्रप्रमुख
नशिराबाद उर्दू ता. जळगाव