Thursday 9 April 2020

Study From Home

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव*
            📖🖊️📝📲

📱 *STUDY FROM HOME*


      विद्यार्थी मित्रांनो , पालक व शिक्षक  आपणास सूचित करण्यात येते की ,
  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , जळगाव यांचे मार्फत
🔹 *इयत्ता १ ली ते ९ वी पर्यंतच्या Online Test तसेच सामान्यज्ञान व इंग्रजी सराव Test*
🔹 *दिक्षा अँप चे घटक*
🔹 *We Learn English ( Audio भाग दररोज 1)*
🔹 *कवितांचे/पाठांचे उपयुक्त व्हिडिओ*
🔹 *चित्रकला*
🔹 *गोष्टी ( Audio , video )*
विद्यार्थ्यांसाठी दररोज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सूचना देऊन या Online चाचण्या सोडविण्यास  प्रेरित करावे.  तसेच इतर अभ्यास नियाजनाप्रमाणे करण्यासाठी सहकार्य करावे. पालकांनी आपल्या मोबाईल वर विद्यार्थांना अभ्यास करण्यासाठी मदत करावी.
 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या Lockdown काळात घरात राहून या चाचण्या विद्यार्थ्यांनी सोडवाव्यात , दिक्षा अँप चा वापर करावा तसेच दररोज दिले जाणारे व्हिडिओ पहावेत, Audio भाग ऐकवावेत. जेणे करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
*घरी राहा स्वस्थ राहा* 
*व नियमितपणे अभ्यास करा.*

3 comments:

  1. सर मी नवनीत सपकाळे सर ,पी.आर.हाय.धरणगाव
    सर मी what's app चा माध्यमातून digital summer campहा गृप तयार केला आहे,त्यात दररोज वैज्ञानिक, सामाजिक, गणित,व वेगवेगळ्या विषयांवर activity दिल्या जातात यात १५०चा वर विद्यार्थी सहभाग नोंदवितात

    ReplyDelete
  2. आ. प्राचार्या मॅडम , सर्व उपक्रम अतिशय उपयुक्त आहेत, विद्यार्थी आवडीने टेस्ट पण सोडवत आहेत, पण math अन science च्या टेस्ट इंग्लिश मध्ये पण उपलब्ध करून द्याव्यात. सेमी माध्यम असल्याने अडचण येत आहे.

    ReplyDelete
  3. आमच्या आॅनलाईन अभ्यासगट, वझरखेडे या अभ्यासगटात सहभागी विद्यार्थी आपण शेयर केलेल्या लिंक्सच्या मदतीने अभ्यास तर करतातच.. परंतु दररोज केलेल्या अभ्यासाच्या नोंदी विषयवार वह्यांमध्येही करतात. बरेच विद्यार्थी, त्यांनी केलेल्या अभ्यासाचे फोटो वर्गशिक्षकांसोबत शेयर करतात. बर्‍याच विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाचे कौतुक आमचे शिक्षकदेखिल विद्यार्थ्यांनी शेयर केलेल्या फोटोंना गृपवर प्रसिध्दी देवून, करतात. घरी राहून अभ्यास करण्याची एक चांगली संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे, असे मी म्हणेन...

    ReplyDelete